शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

राज्य शासन कमकुवत जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:03 IST

कोल्हापूर : राज्यातील कमकुवत जिल्हा मध्यवर्ती बँकांचे राज्य बँकेत विलीनीकरण करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांत अहवाल राज्य बँक आताच मोठ्या आजारपणातून उठली आहे.जिल्ह्यांत सुलभ पतव्यवस्था उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्यातील कमकुवत जिल्हा मध्यवर्ती बँकांचे राज्य बँकेत विलीनीकरण करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यासाठी ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखालील आठ सदस्यीय समिती शासनाने शुक्रवारी नियुक्त केली. या समितीने तीन महिन्यांत अहवाल द्यावा, असे त्यांना सुचविले आहे.

राज्यातील त्रिस्तरीय पत संरचनेमार्फत व व्यापारी बँकांमार्फत पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. पीक कर्ज घेणाºया शेतकºयांपैकी सुमारे ६० टक्के शेतकरी जिल्हा बँकांवर अवलंबून आहेत; परंतु गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप यांमुळे राज्यातील काही मोजक्या जिल्हा बँकांचीच आर्थिक स्थिती चांगली आहे. ज्या बॅँका अडचणीत आहेत, त्या शेतकºयांना पीक कर्ज देऊ शकत नाहीत.ज्या जिल्ह्यात ही पतव्यवस्था मोडकळीस आली आहे, त्या जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्येमागील ते एक महत्त्वाचे कारण ठरले आहे. गोरगरीब शेतकºयाला राष्ट्रीयीकृत बँका दारात उभ्या करून घेत नाहीत व जिल्हा बँका अडचणीत आल्याने त्याला खासगी सावकारांकडे जावे लागते. हे टाळण्यासाठी या जिल्ह्यांत सुलभ पतव्यवस्था उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.राज्य बँकेचेपोट बिघडू नयेअडचणीत आलेल्या जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन झाल्यास राज्य बँकेचे पोट बिघडू नये, अशीही अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. राज्य बँक आताच मोठ्या आजारपणातून उठली आहे. अजूनही या बँकेवर शासननियुक्त प्रशासक मंडळ आहे. त्यामुळे ही नवी जबाबदारी राज्य बँकेला कितपत झेपेल याचा विचार व्हावा असे तज्ज्ञांना वाटते.समिती अशी : ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात (अध्यक्ष) व सदस्य सर्वश्री. डॉ. विजय झाडे (सहकार आयुक्त), राजेंद्र कुलकर्णी (‘नाबार्ड’चे मुख्य सरव्यवस्थापक), विद्याधर अनासकर (अध्यक्ष, महाराष्ट्र नागरी बँक्स फेडरेशन), प्रतापसिंह चव्हाण (मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा बँक), दिनेश ओऊळकर (निवृत्त अप्पर आयुक्त), डी. ए. चौगुले (सनदी लेखापाल) व अप्पर आयुक्त व विशेष निबंधक, मुख्यालय पुणे हे समितीचे सदस्य-सचिव असतील.या १२ बँका आहेत अडचणीतनागपूर, वर्धा, यवतमाळ बुलडाणा, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, धुळे-नंदुरबार, नाशिक, सोलापूर या १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत.विविध कार्यकारी सोसायट्यांचाही अभ्यासराज्य सहकारी बँक-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक-विविध कार्यकारी सहकारी सोसायटी-शेतकरी अशी कर्जवाटपाची साखळी असते. राज्यातील २१ हजार विविध कार्यकारी सोसायट्यांपैकी ११ हजार सोसायट्या सध्या तोट्यात आहेत. त्यांना सक्षम करण्यासाठीच्या उपाययोजनाही सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखालील समिती सुचविणार आहे.समितीची कार्यकक्षाकमकुवत जिल्हा बँका अडचणीत येण्याच्या कारणांचा अभ्यास व त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी उपाय सुचविणे.प्राथमिक कृषी पतपुरवठा सक्षमीकरणासाठी उपाययोजना सुचविणे.त्रिस्तरीय पतपुरवठा संरचना सक्षम करण्यासाठी ‘नाबार्ड’च्या धोरणात सुधारणा सुचविणे.जिल्हा बँका अडचणीत असल्याचे निकष असे : कृषी कर्जवाटपाची त्यांची ऐपत नसते, त्यांचा संचित तोटा वर्षानुवर्षे वाढत जातो, त्यांचे नक्तमूल्य नकारात्मक असते. भांडवल तरलता प्रमाण ९ टक्क्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे बँकिंग परवाना रद्द होतो. बुडित कर्जे (एनपीए) अधिक आहे.

टॅग्स :bankबँकGovernmentसरकार